|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » मुस्लिमांसह अल्पसंख्यांकांसाठी ऍट्रॉसिटी कायदा मंजूर

मुस्लिमांसह अल्पसंख्यांकांसाठी ऍट्रॉसिटी कायदा मंजूर 

ऑनलाईन टीम / नागपूर :

राज्यातील मुस्लिम, बौद्ध यांसारख्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष कायदा मंजूर केला आहे. अल्पसंख्याकांना संरक्षण देणारा ऍट्रॉसिटी कायदा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे अल्पसंख्यांनाही कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.

या नव्या कायद्यांतर्गत अल्पसंख्याक व्यक्तीला घर नाकारले किंवा नोकरीवर ठेवण्यास नकार दिला. तसेच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला तर दोषी व्यक्तीला सहा महिने ते पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. राज्यातील अल्पसंख्याकांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हा कायदा संमत करण्यात आला आहे. यापूर्वी हा कायदा फक्त अनुसूचित जातीतील व्यक्तींसाठी होता. मात्र आता यात अल्पसंख्याकांचाही समावेश करण्यात आला आहे.