|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » दिल्ली डेअरडेव्हिल्सला प्रशिक्षकपदी गिलेस्पी अपेक्षित

दिल्ली डेअरडेव्हिल्सला प्रशिक्षकपदी गिलेस्पी अपेक्षित 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

2017-18 आयपीएल हंगामासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाजी जेसन गिलेस्पी मुख्य प्रशिक्षक म्हणून हवे आहेत.

दिल्ली डेअरडेव्हिल्स प्रँचायझीनी या संदर्भात आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. भारताच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती झाल्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या प्रशिक्षकपद यंदा रिक्त झाले आहे. गिलेस्पी सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश साखळी टी-20 स्पर्धेत ऍडलेड स्ट्रायकर्स संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे. इंग्लिश कौंटी स्पर्धेतील यॉर्कशायर संघाने गिलेस्पीला प्रशिक्षकपदाची ऑफर यापूर्वीच दिली आहे. 2011 आयपीएल हंगामात गिलेस्पी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे गोलंदाज प्रशिक्षक होता.