|Saturday, August 18, 2018
You are here: Home » उद्योग » एअर इंडिया निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी हस्तांतरण तज्ञांची नेमणूक

एअर इंडिया निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी हस्तांतरण तज्ञांची नेमणूक 

 नवी दिल्ली :

कर्जात बुडालेल्या एअर इंडियाची विक्री करण्याचा सरकारचा मानस आहे. या हस्तांतरण प्रक्रियेसाठी हस्तांतरण तज्ञांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमधील हिस्सा विक्री संबंधी विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या मंत्रीगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही बैठक जवळपास एक तास चालली. यात अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच एअर इंडिया निर्गुंतवणुकीसाठी हस्तांतरण तज्ञाची नेमणूक करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि उर्जा मंत्री पीयूष गोयल यांच्यासहीत विविध खात्यांच्या वरि÷ अधिकाऱयांचीही या बैठकीस उपस्थिती होती.

Related posts: