|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिकेत दुसऱयांदा लावण्यात येणाऱया सीसीटीव्हीच्या विषयाला मिळणार ब्रेक

पालिकेत दुसऱयांदा लावण्यात येणाऱया सीसीटीव्हीच्या विषयाला मिळणार ब्रेक 

प्रतिनिधी/ सातारा

यापूर्वी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेले कुठे?, त्या कॅमेऱयांचा मेनटेन्स पालिकेला राखता आला नाही. असे असताना नवीन सीसीटीव्ही कॅमेऱयांचा खेळ कशासाठी चालवला आहे. शहरात कॅमेरे बसवण्याची गरज आहे. त्यामुळे 24 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतील विषय रद्द करण्यात यावा अशी मागणी नगरसेविका लीना गोरे यांनी जिल्हाधिकाऱयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन देताना लीना गोरे, दीपलक्ष्मी नाईक यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पालिकेच्या सर्वसाधारण सभा दि. 24 रोजी झाली. त्या सभेत विषय क्र. 16 पालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा विषय जनहिता संदर्भात नाही. पूर्वी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयांचा मेंन्टन्स पालिकेकडून होत नसून ठिकठिकाणचे कॅमेरे बंद आहेत. तसेच नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे का?, त्याचा नागरिकांना फायदा होणार का?, हा एवढा अनावश्यक खर्च कशासाठी व कुणासाठी?, यापेक्षा सातारा शहराची मुख्य प्रवेशद्वारे, गरजेची ठिकाणे, मुख्य चौक, शाळा, कॉलेज, आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास याचा नागरिकांना फायदा होणार आहे. या कामावरील रक्कम 23 लाख एवढा खर्च चोऱया, दरोडे, चैन स्नॅचिंग, छेडछाड, वाहन चोरी व सातारा शहरातील येणाऱया जाणाऱया चोऱयांवर नियंत्रण राहण्यासाठी करावा. तरी विषय क्र. 16 नुसार पालिका कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या विषयास आमचा विरोध असून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 308 खाली रद्द करण्यात यावा, अन्यथा जनआंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे.

 

Related posts: