|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » बिल वाढवून लावल्याच्या संशयावरून डॉक्टरवर चाकूने  हल्ला 

बिल वाढवून लावल्याच्या संशयावरून डॉक्टरवर चाकूने  हल्ला  

ऑनलाईन  टीम / पुणे  :
बिल वाढवून लावल्याच्या संशयातून 75 वर्षीय रुग्णाने नांदेड फाटा येथील एका रुग्णालयातील डॉक्टरवर चाकूने हल्ला केला. यामध्ये डॉक्टरच्या पोटाला आणि हाताला जखम झाली आहे. हा सर्व प्रकार नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी  हॉस्पीटलमध्ये सोमवारी सायंकाळी घडला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सिंहगड स्पेशालिटी रुग्णालयातील  डॉ. संतोष आवारी हे काही दिवसांपासून दम्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णावर उपचार करत होते. त्याची तब्बेत स्थिर होती, परंतू त्याला आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवणे गरजेचे होते. सोमवारी नेहमिप्रमाणे तपासणी करण्यासाठी डॉ.आवारी त्या रुग्णाजवळ गेले असता त्यांने त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात डॉक्टरच्या पोटावर आणि हातवर जखम झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत.