मालिकाविजयासह भारताची वनडे क्रमवारीत अग्रस्थानी झेप

वृत्तसंस्था/ शारजाह
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱया वनडेत पाच गडी राखून विजय संपादन केल्यानंतर भारताने आयसीसी वनडे क्रमवारीत द.आफ्रिकेला मागे टाकत अग्रस्थान काबीज केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी हॅट्ट्रिक साजरी करणाऱया भारताला ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे. भारत 120 गुणासह अग्रस्थानी असून द.आफ्रिका 119 गुणासह दुसऱया तर ऑस्ट्रेलिया 114 गुणासह तिसऱया स्थानी आहे. मालिकेतील दोन सामने बाकी असून भारताला क्रमवारीत अग्रस्थान आणखी भक्कम करण्याची संधी आहे.
Related posts:
Posted in: क्रिडा