|Friday, October 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पाकिस्तानातील पाच जागृत देवस्थाने

पाकिस्तानातील पाच जागृत देवस्थाने 

भाद्रपद महिना संपला की आपल्याकडे एका मागून एक सणांची सुरुवात हेते. नवरात्र म्हणजे एक पर्वच आहे. आसेतु हिमाचल हा उत्सव साजरा केला जातो. जागृत देवस्थान ही फक्त भारतातच आहेत असे नाही. सर्व जगात अशी देवस्थाने असल्याने प्रत्यक्ष मंदिरे सर्वज्ञात आहेत. आपला शेजारी पाकिस्तान त्याला कसा अपवाद असेल! 1948 साली पाकिस्तान जरी आपल्यापासून वेगळे राष्ट्र झाले असले तरी त्यापूर्वी शेकडो, हजारो वर्षे हा भूभाग भारतीय अर्थात हिंदू संस्कृतीचा अविभाज्य घटक होता. फाळणीनंतर लोकसंख्येची अदलाबदल झाली पण तेथे वर्षानुवर्षे असलेली धार्मिक स्थळे तेथेच राहिली. काळाच्या ओघात तेथील कट्टर धर्माभिमान्यांनी हिंदुंची अनेक धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करून टाकली. आज पाकिस्तानात हिंदू अत्यंत अल्पसंख्य आहेत. त्यांच्या धार्मिक सण-उत्सवांवर तेथील सरकारने किंवा कट्टर धर्माभिमान्यांनी अनेक बंधने लादलेली आहेत. तरीही काही पुरातन मंदिरे तेथे आहेत. पर्यटनस्थळ म्हणून पाकिस्तान सरकारने त्यांची देखभाल केली आहे. अशाच काही मंदिरांची आज आपण माहिती करून घेऊया.

कटास राजमंदिर

‘कटास राजमंदिर’ हे एक जागृत देवस्थान आहे. कटाक्ष हा संस्कृत शब्द. त्याचा अपभ्रंश कटास. त्याचा अर्थ डोळे. शिवजी व पार्वती यांचा काही कारणामुळे वियोग होतो व त्यामुळे पाणावलेल्या शिवजींच्या डोळय़ातून पडलेल्या अश्रूतून ब्रह्मसरोवर स्वरुपात आहे. दुसरे सरोवर कटासराज मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. लाहोरपासून 270 किलोमीटर दूर चक्रवाल जिल्हय़ात हे मंदिर आहे. अहमद नशीद नाहीर यांनी जी डॉक्मयुमेंटरी-वार्तापट काढला आहे त्यात तेथील जागृत स्वयंभू शिवलिंगाची पूजा केल्याचे दाखविले आहे. कटाक्ष मंदिरातील सरोवरात स्नान केल्यास अनेक रोग बरे होतात असा मुसलमानानासुद्धा अनुभव आला आहे. सरावरातील पाण्याचे दोन रंग आहेत. एक हिरवा व दुसरा निळा.

हिंगलाज माता मंदिर

भारतीय उपमहाद्विपात क्षत्रियांची कुलदेवी स्वरुपात हिंगलाज भवानी मातेचे मंदिर 52 शक्तीपीठांपैकी एक आहे. बलुचिस्तानात लयारी जिल्हय़ात हिंगोल नदीच्या किनाऱयावर हे भवानी मातेचे मंदिर आहे. क्वेटा-कराची मार्गावर मुख्य हायवेपासून चालत गेले तर साधारणपणे एक तासाच्या अंतरावर हे जागृत मंदिर आहे. पाकिस्तानातील प्रमुख शहर कराचीपासून 250 किलोमीटर आहे. स्थानिक बलुचीवासी नवरात्रात दर्शनासाठी या मंदिराला भेट देतात. यामध्ये मुस्लीम भाविकांचाही समावेश असतो. हिंदुंच्या एवढीच त्यांची श्रद्धा आहे. एकमेकांशी बोलताना ‘नानी का हज’ दर्शनाला गेलो होतो असा उल्लेख ते करतात. नानी हा संस्कृत ज्ञानी शब्दाचा अपभ्रंश आहे कारण इराणमधील ‘अनाहिका’ देवीला नानी म्हणतात. शिखांचे गुरुदेव नानक यांनी हिंगलाज मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख आहे. मंदिराच्या बाजूला गुरुदेव नानक यांनी ठेवलेला त्रिशूल आजही आहे. मार्च-एप्रिल महिन्यात भरणाऱया उत्सवाला हजारोंची उपस्थिती असते.

गौरी मंदिर

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात थारपारकर जिल्हय़ात हे गौरी मंदिर आहे. पाकिस्तानात या जिल्हय़ातच सर्वाधिक हिंदू वसती करून आहेत. हे हिंदू मूळ स्वरुपात वनवासी आहेत. 40 टक्के हिंदू वस्ती आहे. गौरी मंदिर एका जैन मुनीनी स्थापन केल्याने हे जैन मंदिर म्हणून ओळखले जाते. अनेक देवीदेवतांच्या मूर्तींची स्थापना या मंदिरात केलेली आहे. जैन धर्माचे 25 वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथांची ही मूर्ती आहे. माऊंट अबूमधील स्थापत्य व गौरी मंदिराचे स्थापत्य यांची शैली एकच आहे. आजही जैन धर्माचे स्थानिक अनुयायी नवरात्रात येथे पूजा अर्चा करतात. तेथील स्थानिक भिल्ल व स्थारी वनवासी त्याची देखभाल करतात.

मरि सिंधु मंदिर

मरि सिंधू मंदिर हे पहिल्या ते पाचव्या शतकादरम्यान बनले असावे असा इतिहासकारांचा अंदाज आहे.

राजपूत लोकांनी हे मंदिर बांधले आहे. मरि हा प्रांत गांधार प्रदेशाचा भाग होता असा उल्लेख सापडतो. रणांगणावर जाण्यापूर्वी राजपूत नवरात्रात शस्त्रांची पूजा करून मग स्वारीसाठी निघत अशी प्रथा होती. आजही सिंध मंदिरात शस्त्र पूजा हेते.

शारदापीठ

भगवान शंकरानी सतीचे रूप घेऊन जे तांडव नृत्य केले त्या सतीचा डावा हात काश्मीरमधील शारदा गावात पडला अशी आख्यायिका आहे. सदर शारदापीठ भारतीय नियंत्रण रेषेपासून पाकिस्तान आक्रमित काश्मीरजवळ 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या शारदा गावात आहे. मंदिर भग्नावस्थेत आहे. त्याचे महत्त्व म्हणजे ते 52 शक्ती पीठांपैकी नाही परंतु जी 18 महा शक्तीपीठे आहेत त्यापैकी ते एक आहे.

शैव संप्रदायाचे जनक शंकराचार्य व वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक रामानुजाचार्य या दोघांनी काही दिवस  येथे वास्तव्य केले होते. पंजाबी भाषा गुरुमुखी लिपीचा उगम शारदा लिपीतूनच झाला आहे. काश्मीरच्या आसपासच्या भागात आजही लोक शारदा पीठ म्हणजे एक जागृत ठिकाण म्हणून पाहतात.

शारदाचरण कुलकर्णी

Related posts: