|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » राशिभविष्य

राशिभविष्य 

अपामार्जन उदकशांतीचे महत्त्व भाग दुसरा

बुध. दि. 11 ते 17 ऑक्टोबर 2017

घर म्हटल्यावर रोज अनेक लोक आपल्या घरी येत जात असतात. त्यांच्यासोबत अनेक चांगल्या वाईट अदृश्य शक्तीही येतात. कुणाच्या पायाने लक्ष्मी तर कुणाच्या पायाने संकटे येत असतात. वाईट शक्तीचा प्रवेश होत असतो. अनेकांच्या वाईट नजरा आपल्यावर असतात. जळजळाट, मत्सर, राग, द्वेष, पोटतिडीक, पोटदुखी तसेच निष्कारण एखाद्याच्या मागे त्याची निंदानालस्ती करणे अशा प्रवृत्ती अनादी कालापासून चालू असलेल्या दिसतात. वास्तविक ज्याची मनस्थिती जशी असते तसाच तो वागत असतो त्यामुळे कुणाला दोष देण्यात अर्थ नाही एखाद्याचे बरे झालेले पाहून त्यात आनंद मानणारे व त्याचे कौतुक करणारे लोक फार कमी असतात उलट त्याच्यावर जळणारेच अधिक असतात. त्यामुळे अनेक बऱया अनिष्टशक्ती वास्तूत साठल्या जातात. घरात राग, रुसवा उलट सुलट बोलणे, शिव्याशाप, चेष्टेत शिवी देणे, देवादिकांचा अपमान, पैशाचा दुरुपयोग यासह अनेकांच्या पीडा यांचा सतत मारा वास्तुवर होत असतो. त्यामुळे गंभीर वास्तुदोष निर्माण होतात. वास्तुशास्त्राच्या नावाखाली सर्व काही बदल करूनही त्याचा फारसा गुण येत नाही. सर्व काही सुरळीत व चांगले असूनही सतत अडचणी येत असतात. त्यासाठीच उदकशांत करण्याची प्रथा आहे. चार वेदांचे प्रतिनिधी म्हणून चार भटजी बसून मंत्रघोष करीत असतात. वेदोक्त व पुराणोक्त अशा दोन तऱहेने ही शांती करता येते उदकशांती मंत्रजागर सुरू होताच वातावरण अत्यंत प्रसन्न होते.साक्षात परमेश्वरी शक्ती अवतरल्याचा भास होतो. पण मंत्रजागराचे उच्चार मात्र अत्यंत स्वच्छ असणे आवश्यक आहे. अन्यथा उलट परिणामही होवू शकतो. ज्या ठिकाणी सतत भांडणतंटे, आजार व्यसने, अडचणी, मांसाहार सेवन घराण्यातील काहीजणांचे दुर्वर्तन, गुप्त शत्रुपीडा होत असेल अशा ठिकाणी दरवषी उदर शांत करावी. काही प्रांतामध्ये मुलांच्या परीक्षा परदेशगमन, महत्त्वाच्या वाटाघाटी, नोकरीवर जाण्यापूर्वी तसेच लग्न मुंज करण्यापूर्वी उदकशांत करतात. वातावरणातील दृश्य अदृष्य वाईट शक्तीचा प्रभाव या उदकशांतीमुळे नष्ट होतो. त्रिपींडी श्राद्ध, नारायण नागबली, सर्पसंस्कार हे विधी केल्यानंतर देखील उदक शांती करावीच लागते. त्याशिवाय त्या शांतीचे फळ मिळत नाही. हल्लीच्या या युगात शांती वगैरे बाबींचा खरोखरच अनुभव येतो का हे फक्त मार्केटिंग आहे, असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. कळस नसलेली मंदिरे जागृत नसतात काय? कार्तिक स्वामीचे दर्शन घेवून आर्थिक स्थिती कशी सुधारेल? अथवा शिक्षणात चांगले यश कसे मिळेल? पिंपळाखाली सर्व देवदेवता असतात मग तेथे अवदसा कशी असेल? असा प्रश्नही विचारतात अशा लोकांनी रोज पिंपळाला शिवावे व वर्षभरात काय फरक पडतो. त्याचा अनुभव पहाण्यास हरकत नाही.

 

मेष

आठवडाभर गुरु प्रभावी आहे. या काळात महत्त्वाच्या कामांना सुरुवात करावी. मंगळाचे भ्रमण.जागेचे व्यवहार होऊ लागतील. पण खर्चालाही धरबंध राहणार नाही. चैनीच्या वस्तुसाठी बराच खर्च कराल. पुढील आठवडय़ात गुरु अस्त होत आहे. संततीशी मतभेद होऊ शकतील. काळजी घ्या. आपले शिक्षण, कमाई व इतर बाबी मोबाईलवर टाकू नका. गैरवापर होईल.


वृषभ

राशिस्वामी शुक्र पंचमात आहे. हौशी वृत्तीत वाढ होईल. घरगुती समस्यावर मार्ग मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. गुरु अस्तंगत होत असल्याने महत्त्वाची कामे खोळंबण्याची शक्मयता असते.आर्थिक अडचणी जाणवतील. त्यासाठी आतापासूनच नियोजन करा. म्हणजे पुढे गोची होणार नाही, प्रवासाचे योग येतील. पै पाहुण्यांची वर्दळ वाढेल.


मिथुन

आठवडाभर गुरु प्रभावी आहे. या काळात मंगलकार्यासह कोणतेही महत्त्वाचे काम करून घ्या. त्यानंतर गुरुची शक्ती क्षीण होत असल्याने प्रत्येक कामात अडचणी उद्भवण्याची शक्मयता आहे. शनि महाराज शुभ फळ देण्यास समर्थ आहेत पण अनावश्यक खर्च, व्यसन, भांडण, तंटे, गैरसमज वगैरेपासून दूर रहा. अन्यथा त्याचे चांगले फळ मिळणार नाही.


कर्क

…चतुर्थातील गुरुमुळे. राजयोगाचा काळ सुरू आहे. सर्व तऱहेची समृद्धी प्राप्त होईल. घराण्याचे पूर्व संचित चांगले असेल तर कल्पनाही केला नसाल अशी श्रीमंती प्राप्त होईल. मंगल कार्यातील अडचणी दूर होतील. नोकरी व्यवसायासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय त्वरित घ्यावेत. नंतर गुरुची शक्ती क्षीण झाल्यावर समस्या निर्माण होतील.


सिंह

…. ग्रहांचा शुभ प्रवास आठवडाभर राहील. याच काळात मंगल कार्य नोकरी व्यवसाय, भाग्योदय व परदेश प्रवासाच्या बाबतीत अडलेली कामे करून घ्यावीत काही काळानंतर गुरुचा अस्त होत आहे. आरोग्य व भाग्योदयात अडथळे होऊ शकतील. बँकेत पैसे असूनही ऐनवेळी हाती काही नसेल अशी स्थिती निर्माण होऊ शकते. आपले म्हणणारेही पाठ फिरविण्याची शक्मयता.


कन्या

शुक्राची नाराजी अनेक उत्पात घडवू शकते. त्यामुळे प्रेमप्रकरणे वगैरेपासून दूर राहणे आवश्यक. गुरु प्रभावी आहे. तोपर्यंत कोणतेही आर्थिक काम करून घ्या. सुवर्णालंकार व वस्त्रप्रावरणाचा लाभ होईल. मंगल कार्याच्या दृष्टीने चांगले योग. शुक्र, मंगळाचा योग गैरसमज पसरविणारा आहे. त्यामुळे काळजी घ्यावी.


तुळ

विवाह, प्रवास, कर्जप्रकरणे, वाहन, खरेदी महत्त्वाच्या वाटाघाटी यासह सर्व महत्त्वाची कामे आठवडाभरात करून घ्यावीत सध्या शुक्र, मंगळाची युती सुरू आहे. शिवाय गुरुचा होणारा अस्त काही बाबतीत अडचणी निर्माण करण्याची शक्मयता आहे. कामाचा ताण वाढेल.त्या प्रमाणात पैसा मिळेलच असे नाही. त्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा.


वृश्चिक

साडेसातीचा प्रभाव सुरू आहे. त्यामुळे सर्वच गोष्टी मनाप्रमाणे होत नसतात. पण त्यामुळे नाउमेद न होता कोठे दोष आहेत. त्याचा शोध घेवून त्यानुसार कामाची रुपरेषा आखावी म्हणजे यशस्वी व्हाल. पण आगामी कालखंडात होणाऱया गुरु अस्तामुळे आर्थिक अडचणी व मुलाबाळांच्या बाबतीत किरकोळ त्रास होण्याची शक्मयता.


धनु

अकराव्या गुरुची अनुकूलता आहे. मोठमोठय़ा लाभाची शक्मयता आहे. महत्त्वाची सर्व कामे आटोपून घ्या. यश मिळेल. काही दिवसांनी गुरुचा अस्त होत आहे. त्यामुळे प्रत्येक कामात निरुत्साह जाणवेल. शुक्र, मंगळ योग दशमात आहे. काही बाबतीत काळजी घ्यावी लागेल. नको तेथे औंदार्य दाखवू नका. अंगलट येऊ शकते.


मकर

राशिस्वामी शनि बलवान आहे. शुभाशुभ घटनांचे प्रमाण समसमान राहील. वाहन वगैरे जपून चालवावे. कुणाच्या प्रकरणात चुकूनही मध्यस्थी करू नका. दशमस्थ गुरुचा होणारा अस्त काही कौटुंबिक समस्या निर्माण करण्याची शक्मयता आहे. या आठवडय़ात कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. तसेच कुणावर विसंबुनही राहू नका.


कुंभ

शुक्र, मंगळाचा योग खर्चात वाढ करील. एखाद्या कामासाठी काढून ठेवलेले पैसे दुसऱयाच कामासाठी खर्च व्हावेत. त्यामुळे महिन्याचे बजेट चुकावे असे ग्रहमान आहे. त्यामुळे या आठवडय़ात खर्च व कमाई यांचा ताळमेळ व्यवस्थित ठेवावा लागेल. लवकरच गुरु अस्त  होईल व महत्त्वाची कामे रखडतील त्यासाठी महत्त्वाची कामे याच आठवडय़ात पूर्ण करावीत.


मीन

… राशिस्वामी गुरु बलवान आहे. तोपर्यंत कोणतीही महत्त्वाची आर्थिक कामे करून घ्यावीत. त्यानंतर काही समस्या उद्भवतील. शुक्र, मंगळाचे भ्रमण सांसारिक बाबतीत आनंद निर्माण करणारे पण संशयी वृत्तीला खतपाणी घालणारे आहे. उत्पन्नाचे भिन्न मार्ग व प्रेमप्रकरणे, व्यसने यापासून धोका व नुकसान होण्याची शक्मयता आहे.