|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱयांविरोधात तक्रार

नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱयांविरोधात तक्रार 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिका प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 चे कलम 308 नुसार जिल्हाधिकाऱयांच्या न्यायालयात अमित शिंदे यांनी तक्रार केली आहे. त्यामध्ये नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱयांना यामध्ये पार्टी करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या साताऱयात वातावरण तंग असताना पालिका प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकाऱयांच्या कोर्टात तक्रार दाखल केल्याने याकडे सातारवासियांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

अमित शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सातारा पालिकेच्यावतीने दि. 6 ऑगस्ट 2015 रोजी विषय क्र. 34 अन्वये ठराव नं. 137 पारीत केला आहे. हा ठराव अनाधिकृत, नियमबाह्य व बेकायदेशीर असा असल्याने तो ठराव रद्द व्हावा, अशी मागणी करण्यात आली तक्रारी केली आहे. पालिका प्रशासनाने अधिकार संघाबाहेर जावून मार्च 1996 पासून 4 अभियंते ठेका पद्धतीने वारंवार बेकायदेशीर ठराव करुन कायम केलेले आहेत. ही बाब चुकीची व कायद्यातील तरतुदीच्या विरोधात आहे. पालिकेकडे कायमस्वरुपी तत्वावर अभियंत्यांची नियुक्ती असताना कोणतीही गरज नसताना आर्थिक स्वरुपाची हातमिळवणी करुन खासगी अभियंत्यांची नियुक्ती करुन प्रत्येकी 40 हजार रुपये दरमहा मानधन देण्याचा ठराव मंजूर केला आहे, तो नियमबाह्य आहे.

खासगी अभियंत्यांच्या कामाची माहिती मागितली असता ती माहिती ही खासगी स्वरुपाची आहे. त्यामुळे देता येत नाही, अशी जुजबी कारणे सांगून पालिका प्रशासनाकडून संबंधितांना पाठीशी घातले जात आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. ठराव क्र. 137 हा चुकीचा व बेकायदेशीर आहे. शहरातील नागरिकांचा पैसा विकासकामाकरता न वापरता चुकीच्या लोकांना पोसण्याकरता वापरला जात आहे. लोकांना सार्वजनिक सोयी सुविधा न पुरवता अनाधिकाराने सामान्य जनतेच्या पैशाचा उपद्रव पालिकेकडून सुरु आहे. ही बाब जनहिताच्या विरोधात आहे. बेकायदेशीर ठरावाबाबत वारंवार पालिकेकडे संपर्क साधूनही उडवाउडवीची उत्तरे देवून टाळाटाळ करत आहेत.

पालिका ही स्वायत्त संस्था आहे. सामाजिक कल्याणाकरता सातारच्या विकासाकरता जरूर ती कामे करण्याची गरज आहे. परंतु स्वतःच्या फायद्याकरता काही मंडळींनी जनतेच्या पैशाचा अपहार चुकीच्या मार्गाने पालिका प्रशासन करत आहे. त्यामुळे पालिकेचा हा ठराव रद्द करावा, असे नमूद केले आहे. ही तक्रार केल्याने अगोदर साताऱयात वातावरण तंग असतानाच या तक्रारीमुळे सातारवासियांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Related posts: