|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा विद्यापिठात होणाऱया निवडणूका खुल्या घेण्यात याव्या-

गोवा विद्यापिठात होणाऱया निवडणूका खुल्या घेण्यात याव्या- 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा विद्यापीठात होणारी निवडणूक प्रक्रीया चूकीची आहे. यात बदल होणे आवश्यक आहे. तसेच आता होणाऱया निवडणूका खुली घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना, गोवा प्रदेशचे प्रमुख रीतेश रावळ यांनी पत्रकार परीषदेत  केली.

गोवा विद्यापीठात होणाऱया निवडणूक प्रक्रीया अत्यंत चूकीच्या आहेत. तसेच राजकीय पक्षांचा सहभाग देखील विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. यामुळे भ्रष्टाचार, मारहाण, अपहरण यासारखे प्रकार वाढत चालले आहे. यासंदर्भात मी उच्च न्यायालयात याचिका सादर करणार आहे. तसेच आम्ही, सीव्हायएसएस, तरन्याटय़ांचो आवाज व इतर संघटना एकत्र येऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही भेटणार आहोत. व त्यांनाही या विषयावरची माहीती देणार आहोत. असे रावळ यांनी अधिक माहीती देताना सांगितले.

सध्या गोवा विद्यापिठात उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणी, व त्याबाबत आकारण्यात येणाऱया शुल्काबाबत चर्चा होत आहे. आम्हाला वाटते उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणे आवश्यक नाही. तसेच जर शुल्क आकारण्यात आला तर जे विद्यार्थी या फेरतपासणीत पास होतात त्यांना आकारण्यात आलेले शुल्क परत द्यावे. याबाबत आम्ही उपकुलगुरु यांच्याशी भेट घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडणार आहोत, असेही रावळ यांनी पूढे सांगितले.

पणजीत आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत साईराज नाईक, व लक्ष्मेश शेटकर उपस्थित होते.