|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » क्रिडा » शरापोव्हा शेवटच्या आठ खेळाडूत

शरापोव्हा शेवटच्या आठ खेळाडूत 

वृत्तसंस्था /तियानजिन :

चीनमध्ये सुरू असलेल्या तियानजिन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत रशियाच्या 30 वर्षीय मारिया शरापोव्हाने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. शरापोव्हाने पोलंडच्या लिनेटीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. शरापोव्हाने तब्बल 15 महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर गेल्या एप्रिलमध्ये टेनिस क्षेत्रात पुनरागमन केले होते पण एप्रिलनंतर तिची ही पहिलीच स्पर्धा आहे. चीनमधील या स्पर्धेत शरापोव्हाला विजयासाठी लिनेटीने सुमारे 100 मिनिटे झुंजविले.

Related posts: