|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दिवाळी सुटीसाठी एस.टी.च्या जादा फेऱया

दिवाळी सुटीसाठी एस.टी.च्या जादा फेऱया 

नियमित गाडय़ाशिवाय 325 जादा गाडय़ा धावणार

प्रतिनिधी/ कोल्हापूर

दिवाळीची सुटी सण कॅश करण्यासाठी महाराष्ट्र राज्र मार्ग परिवहन महामंडळांने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाडय़ांची सोय केली आहे. 13 ऑक्टोबरपासून या गाडय़ा धावत असून परतीच्या प्रवासापर्यंत ही सुविधा असणार आहे असे परिवहन मंडळांने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

पुण्याहून येण्यासाठी नियमित गाडय़ा व्यतिरिक्त 325 जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत.  कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून मुंबई, पणजी, बेळगाव, कोकण, सोलापूर या मार्गावरही जादा फेऱया उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बसच्या अधिक माहितीसाठी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील नियंत्रण कक्ष 0231-2650620   या क्रमांकावर चौकशी करावी. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या www.msrtcors.co.in या संकेतस्थळावर  msrtc mobile Reservation App  याद्वारे आगावू आरक्षण करता येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी केले आहे.

कोल्हापूर- पुणे मार्गावर दर तासाला शिवशाही बस

 प्रवाशांच्या अधिक आरामदायी प्रवासासाठी परिवहन महामंडळात नव्याने दाखल झालेल्या शिवशाही या वातानुकुलित बसच्या कोल्हापूर- पुणे मार्गावर दर तासाला एक फेरी आहे. कोल्हापूर – मुंबई या मार्गावर रात्री 10 वाजता एक फेरी आहे.

Related posts: