|Friday, October 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » झी मराठी अवॉर्ड्सवर लागिरं झालं जीची ठसठशीत मोहोर

झी मराठी अवॉर्ड्सवर लागिरं झालं जीची ठसठशीत मोहोर 

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीने यावर्षी अठरा वर्षे पूर्ण केली. अठरा वर्ष म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. यामुळेच यावर्षी ‘उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा’ अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये 10 पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ने बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला.

प्रेक्षकांच्या मतांद्वारे निवडण्यात येणाऱया या पुरस्कारांसाठी यंदा भरघोस मतदानही झाले. राज्यातील 22 शहरांमधून झालेल्या या मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष मतदान, फेसबुकद्वारे मतदान, वेबसाईटवरून मतदान आणि मिस्ड् कॉलद्वारे मतदान असे पर्याय ठेवण्यात आले. या सर्व माध्यमांतून प्रेक्षकांनी 12 लाखांच्यावर मतांचा पाऊस पाडत भरभरून प्रतिसाद दिला. झी मराठीवरील मालिकांमधील कलाकारांचे रंगतदार नफत्य सादरीकरण ‘चला हवा येऊ द्या’च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि जोडीला संजय मोने आणि अतुल परचुरेसारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने हा कार्यक्रम एका वेगळय़ा उंचीवर नेला. सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा सोहळा 15 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता झी मराठी आणि झी मराठी एच डी वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. यावर्षी ‘लागिरं झालं जी’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार असं चित्र सुरुवातीपासूनच निर्माण झालं होतं. याचा प्रत्यय प्रत्यक्ष पुरस्कार सोहळय़ातदेखील आला. ज्यामध्ये ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्राr आणि पुरुष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी असे पुरस्कार पटकावित या सोहळय़ावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली. तर सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि सर्वोत्कृष्ट नायक असे पुरस्कार मिळवत सोहळय़ावर आपली छाप सोडली. यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कारांसाठीही या दोन मालिकांमध्ये जोरदार चुरस रंगली. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा समसमान होता. त्यामुळे या दोन्ही मालिकांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला.

यावर्षीच्या सोहळय़ाची शान ठरली ते यात सादर झालेले रंगतदार परफॉर्मन्स यातही लक्षवेधी ठरली ती प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्रीने सादर केलेली कव्वाली. ‘युं ही सौ साल तक झी मराठी हम भी देखेंगे’ म्हणत या दोघांनी ही कव्वाली सादर करत एकच धम्माल उडवून दिली. तर अजिंक्य-शितल, राणा-अंजली, समीर-मीरा, नीरज-नुपूर या जोडय़ांचा रंगतदार डान्स आणि मल्लिका-जुई, राधिकöशनाया, भानू-शोभा मधील टशन दाखवणाऱया डान्स परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने सादर केलेल्या स्किटने प्रेक्षकांना खळखळून हसवले. कलाकारांसोबतच सूत्रसंचालक संजय मोने आणि अतुल परचुरेंनी विनोदाचं अचूक टायमिंग साधत आपल्या खुमासदार निवेदनाने हा सोहळा अधिकच रंगतदार बनवला.

Related posts: