|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » लोहिया कर्णबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना कपडय़ांचे वाटप

लोहिया कर्णबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना कपडय़ांचे वाटप 

कोल्हापूर

दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित विनयकुमार मदनमोहन लोहिया कर्णबधीर विद्यालयात गेली 45 वर्षे कर्णबधीरांच्या शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक व पुनर्वसन क्षेत्रात कार्य करीत आहे. सध्या विद्यालयात 55 मुले व 40 मुली शिक्षण घेत आहेत. सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक कै. बापूसा जाधव यांची या मुलांच्या प्रति एक वेगळीच आपुलकी होती. या मुलांना दिवाळीत नवीन कपडे व फराळ द्यायचा. हाच वसा त्यांच्या मुलांनी दीपक व भरत जाधव हे पुढे चालवत आहेत. मुलांना त्यांच्या आवडीनुसार कपडे मिळावेत म्हणून त्यांना रिलायन्स मॉलमध्ये नेण्यात आले. या मॉलमध्ये विद्यालयातील शिक्षकांच्या सहायाने तसेच विद्यार्थ्यांच्या आवडीने कपडे खरेदी केले.

कै. बापूसा जाधव यांच्या प्रेरणेतून त्यांच्या पत्नी विजयमाला जाधव, त्यांच्या स्नुषा शर्मिला दीपक जाधव व प्रिया भरत जाधव यांच्या हस्ते मुलांना नवीन डेस प्रदान करण्याता आले. यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधुरी ओगले, वाचा उपचार तज्ञ मधुकर जाधव, क्रीडा शिक्षक सदानंद पाटील, पद्माकर कुलकर्णी, मच्छिंद्र भोंग, उदय राऊत, जालिंदर पाटील, भालचंद्र जोशी, अक्षय खडके, वंदना कांबळे, रोहिणी नलगे, प्रज्ञा उंडाळे, समीक्षा शिंदे आदी उपस्थित होते.

Related posts: