|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चार दिवसाची दिवाळी पण शहरात कचऱयाचा ढिग

चार दिवसाची दिवाळी पण शहरात कचऱयाचा ढिग 

प्रतिनिधी/ सातारा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात स्वच्छता करण्यात येते. दिवाळीच्या चार दिवसांनी शहरात जागो जागी मोठया प्रमाणावर फटाके फेडले गेले ज्यामुळे त्या फटाक्यांचा कचरा रस्त्यावर साचत राहीला आहे, व तो साफ करण्यासाठी नगर पालिकेच्या कर्मचाऱयांनी चार दिवसच हजेरी लावली पण अजूनही कचऱयाचा ढिग जागो-जागी दिसून येत आहे. यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.

दिवाळीच्या सणाला फटाके नाही फोडले तर दिवाळी साजरी केली का असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो. त्यामुळे प्रत्येक घरात 2 हजार 500 ते 3 हजाराचे फटाके खरेदी केले जातात. तसेच शहरातील प्रत्येक ठिकाणी दिवाळीत 4 दिवस मोठया प्रमाणात फटाके फोडण्यात आले. फटाक्यांचा कचरा रस्त्याच्या आजू-बाजूला प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे. हा कचरा साफ करण्यासाठी पालिका कर्मचाऱयांनी दिवाळीच्या चार दिवस साफ सफाई ठेवली पण काही ठिकाणी तर कचरा उचलला गेला नाही. ज्यामुळे त्याचा ढिग लागल्याने मोठया प्रमाणावर प्रदुषण निर्माण झाले आहे. तसेच जागो-जागी कचरा कुंडया ओसांडून वाहू लागले आहेत. साचलेल्या कचरा कुंडीत फिरते भिक्षेकरू कचऱयाच्या कुंडीत टाकाऊ वस्तु शोधाताना दिसत आहेत.

Related posts: