|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » आयडीएफसी-श्रीराम करार रद्द

आयडीएफसी-श्रीराम करार रद्द 

नवी दिल्ली

 आयडीएफसी आणि श्रीराम गुप यांच्या विलीनीकरण करण्यासाठीचा करार रद्द करण्यात आला. दोन्ही कंपन्यांमध्ये स्वॅप रेशोबाबत एकमत न झाल्याचे सांगण्यात आले. दोन्ही कंपन्यांमध्ये विलीनीकरणाचा करार 12 अब्ज डॉलर्सचा होता. आयडीएफसीच्या संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा करार तत्काळ फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले.

श्रीराम सिटी युनियन फायनान्सचा आयडीएफसी बँकेबरोबर विलीनीकरण करण्यासाठी करार करण्यात आला होता. श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स ही अलग कंपनी राहणार होती, आणि ती आयडीएफसीचा हिस्सा असणार होती. या विलीनीकरणामुळे वित्तीय क्षेत्रात मोठे बदल होतील असे सांगण्यात येत होते. विलीनीकरणाने दोन्ही कंपन्यांची वित्तीय विभाग एकत्र येणार होते. आयडीएफसीमध्ये सरकारचा सर्वाधिक 16.4 टक्के हिस्सा आहे. आयडीएफसीचा समभाग 1.2 टक्के आणि आयडीएफसी बँकेचा समभाग 1.9 टक्क्यांनी घसरला.

Related posts: