|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News » ‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच : दीपिका पदुकोण

‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच : दीपिका पदुकोण 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षीत ‘पद्मावती’ सिनेमाला काही संघटनांकडून विरोध होत आहे. या चित्रपटाच्या समर्थनार्थ आता खुद्द ‘पद्मावती’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण मैदानात उतरली आहे. ‘पद्मावती’ सिनेमा प्रदर्शित होणारच आणि त्याला कुणीही थांबवू शकत नाही, असे ती म्हणाली.

गेल्या अनेक दिवसांपासून पद्मावती चित्रपटाला विविध संघटनांकडून विरोध केला जात आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मुद्द्यावरून दीपिका स्वतः पुढे आली आहे. ती म्हणाली, सिनेमा प्रदर्शित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत, असे दीपिकाने म्हटले आहे. एक महिला म्हणून या सिनेमाचा भाग असणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, या सिनेमाची कहाणी सांगणे हे आवश्यक आहे, असेही दीपिका म्हणाली.

Related posts: