|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवबाग महापुरुष देवस्थान नोंदणीकृत

देवबाग महापुरुष देवस्थान नोंदणीकृत 

विविध धार्मिक कार्यक्रमांचे होणार आयोजन

प्रतिनिधी/ मालवण

देवबाग येथील श्री देव महापुरुष देवस्थान स्थानिक समिती नोंदणीकृत बनली आहे. या समितीच्या फलकाचे शुक्रवारी देवबामध्ये मोठय़ा उत्साहात भाजप तालुका उपाध्यक्ष संजय सदाशिव केळुसकर व तारकर्ली सरपंच डॉ. जितेंद्र केरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच उल्हास तांडेल यांनी देवबागमध्ये महापुरुष देवस्थानच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन भविष्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी संजय केळुसकर यांचे महत्वाचे योगदान लाभत असल्याचेही स्पष्ट केले.

महापुरुष देवस्थान रजिस्टर करण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न करण्यात येत होते. समितीची स्थापना 1965 मध्ये करण्यात आली होती. गावात विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी समितीकडून पुढाकार घेतला जात असतो. या समितीत माधव मनोहर राऊळ (अध्यक्ष), मोहन परशुराम राऊळ (उपाध्यक्ष), कांचन एकनाथ कुमठेकर (सचिव), मोहन प्रेमानंद चोपडेकर (खजिनदार), सदस्य-व्यंकटेश शिवाजी राऊळ, गोविंद शंकर ढोलये, नंदकुमार संभाजी गावकर, बाळा राऊळ, नाना राऊळ, धनंजय राऊळ, पुरुषोत्तम राऊळ, दुर्वास कुबल, कृष्णा मालंडकर, विवेक राऊळ, गणेश शेलटकर, किशोर कुबल, दशरथ राऊळ, छोटू केळुसकर, बाबा मोंडकर, संगीता खोबरेकर, जीजी चोडणेकर, मिथुन साळगावकर, आबा कुर्ले, चंद्रकांत वेंगुर्लेकर, किर्तीवान केळुसकर, अवी सामंत, नाना साळगावकर, विनोद मोंडकर हे कार्यरत आहेत.

उद्घाटन सोहळा उत्साहात

नामफलकाचे उद्घाटन करताना संजय केळुसकर व डॉ. केरकर यांनी महापुरुष देवस्थानला आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्पष्ट केले. देवबागात आदर्शवत उपक्रम राबविण्यासाठी आपला पुढाकार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नीलेश सामंत, अवि सामंत, जिजी चोडणेकर, आबा कुर्ली, भाजप महिला तालुका उपाध्यक्षा संगीता खोबरेकर, विवेक राऊळ, दाजी राऊळ, बाबा राऊळ, दयाळ राऊळ आदी उपस्थित होते.

Related posts: