|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लातूरमध्ये एसटीचा भीषण अपघात,सहा ठार

लातूरमध्ये एसटीचा भीषण अपघात,सहा ठार 

प्रतिनिधी / लातूर

निलंगा मार्गावर एसटीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 31 प्रवासी जखमी झाले असून अपघातातील जखमींवर लातूर आणि औसा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एसटी महामंडळाची एम एच 20 डी 9611 ही बस शनिवारी लातूरहून निलंग्याला जाण्यासाठी निघाली. दुपारी तीनच्या सुमारास बस लातूर-निलंगा मार्गावरील चलबुर्गा या गावाजवळ पोहोचली. या दरम्यान विरुद्ध दिशेने येणार्या भरधाव ट्रकने बसला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात 6 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 31 प्रवासी या अपघातात जखमी झाले असून यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात बसचालक आणि वाहक जखमी झाले असून ट्रकचालकाने अपघातानंतर पळ काढला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अपघातातील मृतांची नांवेः-जगन्नाथ विश्वनाथ येणेकुर, वय-60 वर्षे,रा-चौकीवाडी ता. बसवकल्याण, जि. बीदर, मंगल श्रीमंतराव शिंदे, वय-55 वर्षे, रा.हेळंब ता. देवणी, जि. लातूर, श्रुती मारोतीराव पाटील, वय 02 वर्षे, रा.मुळेवाडी, ता. निलंगा, जि. लातूर, गणपतराव किशनराव टोंपे, वय 70 वर्षे, रा.मोरखंडी, ता.बसवकल्याण, जि.बीदर, या अपघातात पाच जणांची ओळख पटली असून एक अनोळखी मृताचे वय 30 ते 40 वर्षे आहे.

Related posts: