|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदी करणार प्रचाराचा धमाका

मोदी करणार प्रचाराचा धमाका 

वृत्तसंस्था /गांधीनगर :

पहिल्या टप्प्यातील जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आता गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराला रंग चढणार आहे. पंतप्रधान मोदी भाजपच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व करणार असून 27 आणि 29 नोव्हेंबरला त्यांच्या आठ ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

ही सर्व ठिकाणे पहिल्या टप्प्यातील असून कच्छ, राजकोट, अमरेली आणि सुरत या जिल्हय़ांमधील आहेत. कच्छमध्ये पाटीदार समुदायाचे वर्चस्व असणाऱया भुज विधानसभा मतदारसंघात मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राजकोट जिल्हय़ातील जसधन, अमरेली जिल्हय़ातील धारी आणि सुरत जिल्हय़ातील कामरेज येथे ते 27 नोव्हेंबरला जाहीर सभा घेतील. हे चारही जिल्हे भाजपचा बालेकिल्ला मानले जातात. यंदा काँग्रेसने तेथे पटेल समुदायातील उमेदवारांना प्राधान्य देऊन भाजपसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्मयता आहे.

काँग्रेसकडून फसवणूक

पटेल (पाटीदार) समुदायाला शिक्षण आणि नोकऱयांमध्ये आरक्षणाचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. त्यावर विश्वास ठेवून तरुण नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसच्या पारडय़ात वजन घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तथापि, कोणत्या मार्गाने आणि घटनेच्या कोणत्या कलमानुसार पाटीदार समुदायाला आरक्षण मिळू शकते, याबाबत काँग्रेसने कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे आरक्षणाचे हे आश्वासन फसवे असल्याचा आरोप भाजपने केला आहे. पंतप्रधान मोदी जाहीर सभांमध्ये या घटनेचा उल्लेख करण्याची शक्मयता भाजपच्या सूत्रांनी क्यक्त केली आहे.

Related posts: