|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » मुंबईत प्रयसीवर ब्लेड हल्ला

मुंबईत प्रयसीवर ब्लेड हल्ला 

ऑनलाईंन टीम / मुंबई :

प्रयसीशी झालेल्या वादातून 25 वर्षीय प्रियकराने तिच्यावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दादर येथे घडली. यात गंभीर जखमी झालेल्या पीडित तरूणीला परळच्या के. ई.एम रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार आहेत.

ऍण्टॉप हिलच्या संगमनगर परिसरात राहणाऱया मोहम्मद अजमल अस्लम शाहचे त्याच परसरात राहणाऱया तरूणीशी प्रेमसंबंध होते.मात्र मागील अनेक दिवसांपासून ती त्याला भेटण्यासाठी टाळाटाळ करत होती. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत हाते. दरम्यान , मोहम्मदने या तरूणीला दादरच्या कैलास लस्सी येथील अप्सरा लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलावले. मात्र ती उशिरा अल्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या मोहम्मदने लकडी फळीने तिला गंभीर मारहाण केली. तसेच शेजारी पडलेली टय़ुबलाईट काढून तिच्या डोक्यात फोडली. ऐवढय़ावरच न थांबता त्याने सोबत आणलेल्या ब्लेडने तिच्या गळय़ावर तसेच मनगटावर वार केले. या सर्व झटपटीत झालेल्या आवाजामुळे लॉजमधील कर्मचारी रूममध्ये गेले व त्यांनी मोहम्मदला पकडले.लॉजवाल्यांनी जखमी तरूणीला तत्काळ केईएममध्ये दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मदला अटक करून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

Related posts: