|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाढीव भूभाडय़ात कपात करण्याचा निर्णय

वाढीव भूभाडय़ात कपात करण्याचा निर्णय 

प्रतिनिधी/बेळगाव

महापालिकेच्यावतीने भूभाडे वाढ करून आकारण्यास प्रारंभ केल्याने फेरीवाल्यांनी विरोध केला होता. यामुळे भूभाडे कमी केले असून कपात करण्यात आलेल्या दरानुसार भूभाडे आकारण्यात येत आहे. यामुळे भूभाडे वाढविणे आणि कपात करण्यामागे रंगलेल्या राजकारणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

 शहरातील फेरीवाल्यांकडून भूभाडे आकारण्यात येत होते. मात्र यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाजी विपेत्यांकडून 10 रुपये,  फेरीवाल्यांकडून 50 रुपये आणि पावभाजी, भेळपुरी, आईस्क्रिम, फास्ट फूड आदींसह विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून 100 रुपये आकारण्याचा निर्णय अर्थ, कर आणि महसूल स्थायी समिती बैठकीत घेण्यात आला होता. तसेच या नव्या दरानुसार भूभाडे आकारण्यास प्रारंभ करण्यात आला होता. पण याला विपेत्यांनी विरोध करून वाढीव दरानुसार भूभाडे देण्यास विरोध केला होता. तसेच  फेरीवाल्यांसह रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन दिले होते. भूभाडे वाढ कमी करण्याची मागणी केली होती.

  यामुळे अर्थ, कर आणि महसूल स्थायी समिती बैठकीत भूभाडे आकारणीबाबत चर्चा करून वाढीव भूभाडय़ात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार नव्या दरानुसार भूभाडे आकारण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱया भाजी विपेत्यांकडून दहा रुपये, फेरीवाले व हातगाडी व्यावसायिकांकडून 50 रुपये तसेच पावभाजी, भेळपुरी, आईस्क्रिम, फास्ट फूड, नारळ विपेत्यांसह खाद्यपदार्थांची विक्री करणाऱयांकडून 100 ऐवजी 50 रुपये आकारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे रस्त्यावर थांबून व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

 अर्थ, कर आणि महसूल स्थायी समिती अध्यक्षांनी भूभाडे वाढविल्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामुळे नेमके राजकारण काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. भूभाडे वाढीच्या मुद्यावर महापालिका सभागृहात जोरदार चर्चा झाली होती. यावेळी विविध आरोप प्रत्यारोप झाले होते. भूभाडे वाढीच्या मुद्दय़ावर चांगलेच राजकारण रंगले होते.

Related posts: