|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लिश युवा संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी ट्रॉट

इंग्लिश युवा संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी ट्रॉट 

वृत्तसंस्था / लंडन

पुढील महिन्यात न्यूझीलंड होणाऱया 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंड संघासाठी माजी कसोटीवीर आणि फलंदाज जोनाथन ट्रॉटची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने केली आहे.

19 वर्षाखालील वयोगटासाठी ही विश्वचषक स्पर्धा न्यूझीलंडमध्ये जानेवारीत होणार आहे. इंग्लंड युवा संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जॉन लेविसला नियुक्त केले आहे. रिचर्ड डॉसन हे संघाचे दक्षिण आफ्रिकेत होणाऱया तिरंगी मालिकेसाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहतील. या तिरंगी मालिकेत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया यांचा समावेश आहे.

Related posts: