|Monday, July 16, 2018
You are here: Home » Top News » मोदींनी लोकपाल विधेयक कमकुवत केला : अण्णा हजारे

मोदींनी लोकपाल विधेयक कमकुवत केला : अण्णा हजारे 

ऑनलाईन टीम / भोपाळ :

यूपीए सरकारने पारित केलेला लोकपाल विधेयक मोदी सरकारने कमकुवत केल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.

मध्य प्रदेशातील पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या खजुराहोमधील एका संमेलनादरम्यान अण्णा हजारे बोलत होते.मोदी सरकारच्या धोरणांवरही त्यांनी यावेळी जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “ मनमोहन सिंह बोलत नव्हते,मात्र त्यांनी लोकपाल – लोकायुक्त कायद्याला कमकुवत केले.आता पंतप्रधान मोदींनीही हा कायदा कमकुवत करण्याचे कामकाज केले आहे. मनमोहन सिंह यांनी कायदा तयार केला.त्यानंतर मोदींनी 27जुलै 2016 रोजी एक दुरूस्ती विधेयकाअंतर्गत हे निश्चित केले ,की अधिकारी त्यांची पत्नी,मुले यांना त्यांच्या संपत्तीचा वार्षिक तपशील द्यावा लागणार नाही,तर लोकपाल हा तपशील देणे आवश्यक होते,तसेच जो कायदा पाच वर्षात झाला नाही, त्याला तीन दिवसात कमकुवत करण्यात आले, असा आरोपही अण्णांनी केला.

Related posts: