|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बलात्कारी आरोपींना फाशीच

बलात्कारी आरोपींना फाशीच 

मध्यप्रदेशमध्ये विधेयक मंजूर : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल

वृत्तसंस्था / भोपाल

बलात्कार करणाऱया आरोपींना फाशीचीच शिक्षा सुनावण्याबाबतचे विधेयक मध्य प्रदेश विधानसभेने हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर केले आहे. महिला व कन्या सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. हे विधेयक आता राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. राज्यातील विरोधी पक्षांनीही या विधेयकाचे स्वागत केले आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, महिला सुरक्षेच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिला, मुलींच्याविरोधात होत असलेल्या गुन्हय़ांना आळा घालण्यासाठी न्याय व तपास यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने हे विधेयक उपयुक्त ठरेल. 12 वर्षापर्यंतच्या मुलींवर अत्याचार करणाऱयांना अथवा सामुहिक बलात्काराच्या घटनेतील आरोपींना या विधेयकामुळे फाशीवर लटकवणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.

या प्रस्तावित विधेयकामध्ये अनेक कडक उपाययोजना सुचवण्यात आले आहेत. विवाहाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱयांनाही याच विधेयकाच्या कक्षेत आणले आहे. यामुळे महिलांविरोधातील गुन्हे कमी होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. महिलांवर हल्ले करण्यासारख्या गुन्हय़ामध्ये 1 लाखापर्यंत आर्थिक दंडाची तरतूदही केली आहे. अत्याचारग्रस्ताची बाजू मांडल्याशिवाय आरोपीला जामीनही न देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Related posts: