|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वायरी भूतनाथ किनाऱयावर आढळली ऑलिव्ह रिडेल कासवाची 138 अंडी

वायरी भूतनाथ किनाऱयावर आढळली ऑलिव्ह रिडेल कासवाची 138 अंडी 

वार्ताहर / मालवण:

सोमवारी रात्री वायरी भूतनाथ जाधववाडी येथील समुद्रकिनाऱयावर ऑलिव्ह रिडले या कासवाची 138 अंडी मच्छीमारांना आढळली. मच्छीमारांनी याची माहिती वनविभागाला दिली. मालवण वनक्षेत्रपाल मसुरकर यांनी दिलेल्या सुचनेनुसार यातील 136 अंडी संरक्षित करण्यात येणार आहेत.

मच्छीमारांना वायरी जाधववाडी येथील समुद्रकिनाऱयावर ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी सापडली. स्थानिक मच्छीमारांनी याबबतची माहिती वनक्षत्रेपाल मसुरकर यांना दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल मसुरकर यांनी वायरी-भूतनाथ जाधववाडी किनाऱयावर येऊन या अंडय़ांची पाहणी केली व त्यांचा पंचनामा केला. पाहणीनंतर या सर्व अडय़ांना संरक्षित करण्याचे ठरविण्यात आले. यातील दोन अंडी ही खराब झाल्याने 136 अंडी संरक्षित करण्याची जबाबदारी स्थानिक मच्छीमारांकडे सोपविण्यात आली.

Related posts: