|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कार-ट्रक अपघात महिला ठार

कार-ट्रक अपघात महिला ठार 

प्रतिनिधी/ धारबांदोडा

अनमोड घाटात मालवाहू ट्रक व इंडिका कार यांच्यात अपघात होऊन कारगाडीतील अभिबा अब्दूल करीम भडकल (60, रा. भडकल गल्ली-बेळगाव) ही महिला जागीच ठार झाली. कारमधील अन्य तिघे जखमी झाले असून सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. काल मंगळवारी दुपारी 12.45 वा. सुमारास मोले चेकनाक्यापासून साधारण तीन किलो मिरटच्या अंतराव हा अपघात झाला.

नझरिन इरफान अब्दूल करिम (48), इरफान अब्दूल करिम भडकल (52) आणि शोहब इरफान अब्दूल करिम (19) अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भडकल कुटुंबिय एमएम 14 एम 9982 या क्रमांकाच्या इंडिका कारने गोव्याहून बेळगावकडे जात होते. घाटमार्गावरील एका वळणावर समोरुन येणाऱया केए 31-8520 या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने कारला एका बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक एकवढी जबरदस्त होती की, मागील सिटवर बसलेल्या अभिबा भडकल यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेही जखमी झाले. कारला धडक दिल्यानंतर हा ट्रक रस्त्याच्या बाजूच्या कडय़ावर जाऊन आदळला. सदर मालवाहू ट्रक बेळगाहून वास्को येथे निघाला होता. कुळे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी व साहा. उपनिरीक्षक सदानंद देसाई यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Related posts: