|Friday, December 15, 2017
You are here: Home » Top News » मोदी नीच व्यक्ती ः मणीशंकर अय्यर

मोदी नीच व्यक्ती ः मणीशंकर अय्यर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसचे ज्ये÷ नेते मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. मोदी अतिशय नीच व्यक्ती असून, किमान सौजन्य देखील त्यांच्याकडे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आज (गुरुवारी) दिल्ली येथे डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. दरम्यान, केंद्राच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला. ‘राष्ट्र उभारणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. हे योगदान दुर्लक्षित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, तरीही ज्या कुटुंबाने असे प्रयत्न केले त्यांच्यापेक्षा आंबेडकरांचाच लोकांवर जास्त प्रभाव राहिला,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना मणीशंकर अय्यर यांची जीभ घसरली.

Related posts: