|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर लाल पिवळा ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाचा अवमान

प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर लाल पिवळा ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाचा अवमान 

बेळगाव / प्रतिनिधी :

शहरातील प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या लाल पिवळा ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचे कृत्य प्रशासन करीत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी युवा मंचच्या वतीने प्रशासनाचा अभिनव पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला. येथील धर्मवीर संभाजी चौकात कार्यकर्त्यांनी डोळय़ांवर पट्टी बांधून प्रशासनाच्या भूमिकेबद्दलचे वास्तव सामोरे आणण्याचा प्रयत्न केला.

गुरूवारी ध्वजदिनाचे औचित्य साधून मराठी युवा मंचने हे निषेध आंदोलन छेडले. ध्वजदिनाच्या निमित्ताने सर्वत्र ध्वजाचा सन्मान करण्यात येतो. परंतु बेळगावात प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर लाल पिवळा ध्वज बेकायदेशीर रित्या फडकत आहे. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान घडतो आहे. याची नोंद घ्यावी आणि हा प्रकार थांबवावा, अशी मागणी युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी मंचचे नारायण किटवाडकर, द्वारकानाथ उरणकर, अजित कोकणे, सूरज कणबरकर, सतिश गावडोजी, सुधीर कालकुंद्रीकर आदी उपस्थित होते.

Related posts: