|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराची सांगता

पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराची सांगता 

गांधीनगर / वृत्तसंस्था :

साऱया देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता गुरूवारी झाली आहे. या टप्प्यात सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील एकंदर 89 मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाची वेळ सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. सर्व मतदानयंत्रांना यावेळी पावती यंत्रे जोडण्यात येतील, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. प्रशासनाने मतदान शांततेत आणि दबावमुक्त वातावरणात पार पडावे, यासाठी जय्यत तयारी केली आहे.

सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातच्या सुरत भागात पाटीदार (पटेल) समाजाच्या मतदारांची संख्य लक्षणीय आहे. नोकऱया आणि शिक्षणात आरक्षणाच्या मागणीसाठी याच समाजातील हार्दिक पटेल याने आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाचा प्रभाव किती आहे, याचे उत्तर या टप्प्यात मिळणार आहे. गेले पंधरा दिवस हा संपूर्ण भाग विविध नेत्यांच्या प्रचार दौऱयांमुळे ढवळून निघाला होता.

Related posts: