|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » कोळसा घोटाळा ; झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना 3 वर्षांची शिक्षा

कोळसा घोटाळा ; झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना 3 वर्षांची शिक्षा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोळसा घोटाळय़ात शनिवारी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना 25 लाखांचा दंडही ठोठावला आहे कोडा आणि इतर तीन दोषींना हायकोर्टात आपील करण्यासाठी 2 महिन्यांचा अंतरिम जामीनही देण्यात आला आहे.

व्हीआयएसयूएलने 8 जानेवारी 2007मध्ये कोळसा खाणीसाठी अर्ज केला होता,झारखंड सरकार आणि पोलाद मंत्रालयाने खाण वाटपसंदर्भात शिफारस केली नव्हती,पण 36व्या चौकशी समितीने ती केली.चौकशी समितीचे तत्कालीन अध्यक्ष एच.सी.गुप्ता यांच्याकडे त्या वेळी कोळसा मंत्रालयाचा प्रभार होता,सरकारने कंपनीला कोळसा खाण देण्याची शिफारस केली नव्हती हे सत्य गुप्ता यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यापासून लपवून ठेवले होते.या प्रकरणामध्ये कोर्टाने मधू कोडा,माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता ,राज्याचे माजी मुख्य सचिव अशोक कुमार बसू आणि एक अधिकारी यांना दोषी ठरवले आहे.

 

 

 

 

Related posts: