|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Automobiles » रॉयल एन्फील्डच्या विक्रीत 17 टक्क्यांनी वाढ

रॉयल एन्फील्डच्या विक्रीत 17 टक्क्यांनी वाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

क्रूज श्रेणीतील दुचाकी बनवणारी कंपनी रॉयल एन्फील्डचा 2017चा शेवट गोड झाला आहे. डिसेंबर महिन्या रॉयल एन्फील्डची विक्री 16.67 टक्क्यांनी वाढली असून यंदाची विक्री 66,968 इतकी राहिली. डिसेंबर 2016मध्ये हाच आकडा 57,398वाहन इतका होता. त्यामुळे रॉयल एन्फील्डीच्या विक्रीत 2017मध्ये तब्बल 17टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, देशांतर्गत विक्रीचा विचार करता ती 65,367 वाहने इतकी झाली आहे. जी डिसेंबर 2016मध्ये 56,316 वाहन इतकी होती. रॉयल एन्फील्डची निर्यातही 47.96टक्क्यांनी वाढली असून, ती 1,601 वाहन इतकी राहिली आहे. डिसेंबर 2016मध्ये हाच आकडा 1,082 इतका होता.

 

 

 

 

Related posts: