|Monday, December 17, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सैन्याचे आधुनिकीकरण आवश्यक

सैन्याचे आधुनिकीकरण आवश्यक 

सैन्यप्रमुख बिपिन रावत यांचे प्रतिपादन : भविष्यातील युद्ध अवघड स्थितीत होणार : सज्जता गरजेची

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सैन्यप्रमुख बिपिन रावत यांनी देशात निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा असे मत व्यक्त केले. निर्यातीवरील अवलंबित्व कमी करत भविष्यातील युद्ध स्वदेशी शस्त्रास्त्रांनी लढण्याची वेळ आता आल्याचे विधान रावत यांनी दिल्लीत आयोजित ‘सैन्य तंत्रज्ञान’ चर्चासत्रात बोलताना केले. याचबरोबर त्यांनी सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाची गरज अधोरेखित केली. सैन्याने आधुनिकीकरणाच्या योजनेला मागील वर्षीच अंतिम रुप दिले. यांतर्गत आगामी काही वर्षांमध्ये सैन्याच्या ताफ्यातील वर्तमान शस्त्रास्त्रांना बदलले जाणार आहे.

सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. आगामी काळात युद्ध अवघड स्थितींमध्ये होणार असल्याने सज्ज राहण्याची गरज आहे. आधुनिकीकरणाचा प्रवास सुरू असून तो कायम राहायला हवा. जर उद्योगक्षेत्राकडून पाठिंबा मिळाला तर सैन्य स्वतः पुढाकार घेऊन तंत्रज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करेल असे रावत म्हणाले.

आधुनिकीकरणाची योजना

सैन्याने 40 हजार कोटी रुपयांच्या योजनेला अंतिम रुप दिले आहे. यानुसार जुन्या शस्त्रास्त्रांच्या जागी सैन्याला नवी शस्त्रास्त्रs दिली जातील. सद्यकाळात देशाच्या पश्चिम आणि पूर्व सीमेवरील धोके पाहता सैन्याला ही शस्त्रास्त्रs लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे. सैन्याला आधुनिक रायफल, लाइट मशीनगन आणि काबाईन यासारखी शस्त्रास्त्रs मिळणार आहेत.

चिनी सैनिकांची संख्या घटली

अरुणाचल प्रदेशच्या टूटिंगमध्ये चीनकडून रस्तेनिर्मितीच्या प्रयत्नाबद्दलचा वाद सोडविण्यात आला आहे. टूटिंगमधील वादानंतर चीनसोबत सीमा चौकी बैठक झाली होती. या बैठकीनंतर चीनने स्वतःची यंत्रसामग्री परत नेल्याची माहिती रावत यांनी दिली. याचबरोबर डोकलामला लागून असलेल्या चिनी भागातील सैनिकांच्या संख्येत घट झाल्याचा दावाही त्यांनी केला.

Related posts: