|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दोनापावला अपघातात करंजाळचे दोन युवक ठार

दोनापावला अपघातात करंजाळचे दोन युवक ठार 

प्रतिनिधी /पणजी :

दोनापावला येथे झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. पणजी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दुचाकी चालकाविरोधात भादंसंच्या 279, 337, 304 (ए), व 128 कलमाखाली तसेच 129 एमव्ही कायद्याखील गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात ठार झालेल्या युवकांमध्ये रुफ वेल्हो (16), सोहील शेख (19) यांचा समावेश आहे. दुचाकीचालक जेसबेन पावलो सिक्वेरा (19) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तिघेही करंजाळे-ताळगाव येथील आहेत.

सदर अपघात ब्रिटीश सिमेंट्रीजवळ दोनापावला रस्त्यावर दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास झाला. तिघेही युवक जीए-07-जे-0482 क्रमांकाच्या यामाहा दुचाकीवरून निवो सर्कलकडून राजभवनच्या दिशेने जात होते. ब्रिटीश सिमेंट्रीजवळ दुचाकी पोचली असता चालकाचा ताबा सुटला. दिशादर्शक फलकावर दुचाकीची धडक बसल्याने तिघेही रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. दुचाकी एवढय़ा वेगात होती की दुचाकीवर मागे बसलेले युवक रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांना जागीच मृत्यू आला. चालकालाही बराच मार लागला आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवण्यात आले आहे. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related posts: