|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » श्री सिद्धीविनायकाची आज भव्य रथयात्रा

श्री सिद्धीविनायकाची आज भव्य रथयात्रा 

प्रतिनिधी, मुंबई

कोटय़ावधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धीविनायकाची भव्य रथयात्रा सोहळा माघ उत्सवानिम्मित रविवारी आयोजित करण्यात आला आहे. या रथयात्रेत महाराष्ट्रातील लोककला व परंपरेचे दर्शन घडणार आहे. श्रीसिद्धीविनायक  गणपती मंदिरात माघ गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दि 18 जानेवारी 2018 पासून सुरु झालेला हा उत्सव दि 24 जानेवारी  2018 पर्यंत चालणार आहे. रविवार दि 21 जानेवारी रोजी श्री सिद्धीविनायक भक्तांच्या भेटीला येणार असून यंदाचा रथोत्सव आगळावेगळा ठरणार आहे. सांयकाळी 4.00 वाजता ही रथयात्रा श्री सिद्धीविनायक मंदिरातून निघणार आहे.

 

400 कलांवत व लोककलेचा अविष्कार

रथयात्रेत महाराष्ट्राच्या विविध भागातील जवळपास 400 लोककलाकार सहभागी होणार आहेत. दशावतार, जाखडी, दांडपट्टा, लेझीम, कोबंडा, आदिवासी ढोल, पालखी, लेझीम वाल्या तारपा इ. सारख्या महाराष्ट्रातील लोककला आणि परंपरेचे दर्शन या रथयात्रेतून मुंबईकरांना धाडणार असल्याची माहिती श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष बांदेकर यांना दिली.

 

अशी निघेल रथयात्रा

श्री सिद्धीविनायक मंदिरापासून निघणारी रथयात्रा आगार बाजार, पोतुर्गीज चर्च,  शंकर मार्ग, अप्पासाहेब मराठे मार्ग ते पुन्हा सिद्धीविनायक मंदिर अशी असेल या रथयात्रेत हजारोंच्या संख्येंने भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन आदेश बांदेकर यांनी केले आहे.

Related posts: