|Friday, July 19, 2019
You are here: Home » Automobiles » ‘रेनॉ’ची भारतातील बेस्ट सेलिंग कार कंपनीने मागवल्या परत

‘रेनॉ’ची भारतातील बेस्ट सेलिंग कार कंपनीने मागवल्या परत 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

‘रेनॉ’ या कंपनीला भारतातील त्यांची बेस्ट सेलिंग कार ‘व्किड’ला तांत्रिक बिघाडामुळे रिकाल करावे लागले आहे. तांत्रिक बिघाड ही किती कारमध्ये आहे, हे अद्यापही सांगण्यात आले नाही.

0.8 लिटर व 1.0 लिटर इंजिनमध्ये उपलब्ध असलेली ही कार स्टीअरिंग सिस्टिममध्ये बिघाड असल्या कारणामुळे कंपनीने गाडय़ा परत मागविल्या आहेत. कंपनीकडून ‘व्किड’ कार घेणाऱया ग्राहकांना ऑफिशिअल पत्र पाठवून त्यांना जवळच्या रेनॉ डिलरशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. डिलर्सकडून ‘व्किड’कारची स्टीअरींग सिस्टमची चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी ग्राहकांना शुल्क देण्याची आवश्यकता नसेल.