|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘म्हादई संपदा रक्षा यात्रा’ आजपासून

‘म्हादई संपदा रक्षा यात्रा’ आजपासून 

गोवा सुरक्षा मंचतर्फे आयोजन

प्रतिनिधी/ पणजी

गोवा सुरक्षा मंचतर्फे ‘म्हादई संपदा रक्षा यात्रा’ आज बुधवार दि. 24 जानेवारीपासून बाराजण येथून रथसप्तमीच्या शुभ मुहुर्तावर सुरु करण्यात येत असून ती सप्ताहभर म्हणजे 30 जानेवारीपर्यंत चालणार आहे. मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर आणि उपाध्यक्ष गोविंद देव यांच्या नेतृत्वाखाली यात्रा करण्यात येणार असून ती विविध भागातून फिरणार आहे.

 गोव्यासाठी म्हादई नदी जीवनदायिनी कशी आहे, याची जागृती यात्रेतून करण्यात येणार असून पाणी वळवल्यास निर्माण होणाऱया धोक्याचीही कल्पना दिली जाणार आहे.

 म्हदाईच्या दहा ठिकाणच्या जलाचा कुंभ

म्हादईच्या 10 ठिकाणच्या प्रवाहातील पाणी आणून ते एका जलकुंभात समारंमपूर्वक भरले जाऊन हा जलपुंभ पूजन करुन यात्रेबरोबर असलेल्या सुशोभित रथात ठेवण्यात येणार आहे. झर्मे, नानोडा, तुये, नांदोडा, हरवळे, वाळंवटी, सिकेरी, कुडचिरे, आमठाणे-अस्नोडा व बाराजण अशा 10 ठिकाणीच्या प्रवाहाचे पाणी एकत्र करण्याचे काम सचिव नितीन फळदेसाई यांच्या नेतृत्वाखालील युवा पथकाने पूर्ण केले आहे.

यात्रेपूर्वी म्हादईच्या प्रवाहाच्या काठाकाठाने जाऊन प्रत्यक्ष निरीक्षण व यात्रेचा मार्ग ठरविण्यासाठी ज्येष्ठ उपाध्यक्ष किरण नायक, पर्यावरण जाणकार मिलिंद कारखानीस यांच्या नेतृवाखाली प्रमुख पदाधिकाऱयांनी केले आहे. यात्रेची रंगीत तालीमही काल घेण्यात आली.

आज बाराजण येथून यात्रेचा शुभारंभ

आज बुधवार दि. 24 जाने. सकाळी 10.30 वा. बाराजण येथे ‘संगम पूजन’ 11 ते 12.30 वा. दरम्यान सुर्ल येथील मंदिरात जलकुंभात 10 ठिकाणचे जल मिसळून नंतर जलकुंभ पूजन व सभा होईल. त्यानंतर सायंकाळी 4 ते 5 वा. दोन माड केरी येथे कार्यक्रम सभा. सायं. 6.30 वा. सांखळी येथे पदयात्रा व जुनाबाजार, वरची आळी येथे कार्यक्रम व हॉस्पिटल जंक्शनपर्यंत पदयात्रा करण्यात येईल.

उद्या वाळपई, नगरगाव ते साटरे

गुरुवार दि. 25 जाने. सकाळी 10.30 वा. वाळपईत आगमन, 10.30-11 वा. नवा पंप ते वाळपई पालिका पदयात्रा, 12 वाजता वेळुस मंदिराजवळ कोपरा सभा, 12.15 नगरगाव मारुतीमंदिर ते शांतादुर्गा मंदिर पदयात्रा, 12.30 ते 1.30 नगरगाव शांतादुर्गा मंदिरात सभा. त्यानंतर दुपारी 3.30 वा. बांबर ओवाळणी, कोपरा सभा, 4.30 कोदाळ ओवाळणी, 5.30 साटरे गावात आगमन, 6.30 ते 7.30 साटरे येथे कार्यक्रम होणार आहे.

Related posts: