|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सोन्याला सर्वोच्च झळाळी, 31450 रुपये तोळय़ाचा दर

सोन्याला सर्वोच्च झळाळी, 31450 रुपये तोळय़ाचा दर 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

गेल्या 14 महिन्यांमध्ये सोन्याने सर्वोच्च दर गाठला असून प्रतितोळय़ाला 31450 रुपये दर गुरुवारी नोंदला गेला. ओव्हरसीज मार्केटमधील मजबुती आणि स्थानिक ज्वेलर्सकडून मागणी वाढल्याने गुरुवारी एकच दिवसात दराने 350 रुपयांची उसळी घेतली. तर चांदी दरातही 1100 रुपये वाढ नोंदवली गेली असून सध्या हा दर प्रतिकिलोला 41 हजार रुपये आहे.

ट्रेडर्सच्या मते ओव्हरसीज मार्केटमधील स्थिरता, मजबुती ही दरवाढीची मुख्य कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीही गेल्या तीन वर्षांतील न्युनतम पातळीवर गेल्या आहेत. अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्टीव्हन मुशिन यांनी डॉलरची किमत उतरली असली तरी त्याचे स्वागतच केले आहे. मात्र यामुळे सोन्याच्या दराने एकदम उसळी घेतली आहे. तसेच स्थानिक पातळीवरही ज्वेलर्सकडून मागणी वाढल्यानेही दर 31 हजारावर गेले असल्याचे मत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सिंगापूरला सोनेदरात 0.43 टक्के इतकी वाढ नोंदवली असून हा दर आता 1363.50 डॉलर्स प्रती औंस इतका झाला आहे. तर चांदीमध्येही वाढ होऊन 17.58 प्रतिऔंस डॉलर्स झाली आहे.

भारताचा विचार करता दिल्लीमध्ये शुद्ध सोन्याच्या दरात तब्बल 350 रुपयांची वाढ होऊन प्रतितोळा 31300 वर दर गेला आहे. तर चांदी दरातही 1100 रुपयांची वाढ झाली असून 41000 रुपये प्रतिकिलोचा दर झाला आहे.