|Saturday, May 25, 2019
You are here: Home » क्रिडा » अंकिता रैना, करमन कौरची चमक, फेडरेशन

अंकिता रैना, करमन कौरची चमक, फेडरेशन 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अंकिता रैनाने वैयक्तिक विजयी घोडदौड पुढे चालू ठेवत शुक्रवारी आणखी एक शानदार विजय मिळविला. तिला अन्य सहकाऱयांकडूनही चांगली साथ मिळाल्याने फेडरेशन चषक टेनिसमधील या लढतीत भारताने हाँगकाँगचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.

करमन कौर थांडीने अनेक चुका केल्या तरीही तिने युडाईस चाँगवर 6-3, 6-4 असा विजय मिळवित आशिया ओशेनिया गट एक मधील या लढतीत भारताला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. अशा प्रकारे करमन कौरने फेडरेनश चषकातील चार सामन्यांची पराभवाची मालिका खंडित केली. गेल्या वषी कझाकविरुद्धच्या लढतीत तिने शेवटचा विजय मिळविला होता. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या अंकिता रैनाने या स्पर्धेत आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या खेळाडूंना चकित केले आहे. तोच जोम तिने या लढतीतही कायम ठेवताना दुसऱया सामन्यात लिंग झांगचा 6-3, 6-2 असा पराभव करून भारताला 2-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. या मोसमातील भारतीय महिलांचा हा पहिलाच विजय आहे. नंतर बिनमहत्त्वाच्या दुहेरीच्या सामन्यात प्रार्थना ठोंबरे व प्रांजला यडलापल्ली यांनी क्वान याव एन्ग व चिंग हु वु यांच्यावर 6-2, 6-4 अशी मात करीत भारताच्या एकतर्फी विजयावर शिक्कोमोर्तब केला.

यापूर्वी भारताने फेब्रुवारी 2016 मध्ये 3-0 असा शेवटचा विजय मिळविला होता. थांयलंडमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत भारताने कझाकस्तानला हरविले होते. शनिवारी भारतीय महिलांची चिनी तैपेईशी पदावनतीसाठी प्लेऑफ लढत होणार आहे. तैपेईने गट ब मध्ये चौथे स्थान मिळविले आहे. या लढतीतील विजयी संघ पुढील वषीही गट एकमध्येच खेळेल तर पराभूत झालेल्या संघाला गट 2 मध्ये खेळावे लागणार आहे. चिनी तैपेई व भारत यांच्यात यापूर्वी 2011 मध्ये शेवटची गाठ पडली होती. थायलंडमधील त्या स्पर्धेत तैपेईने भारतावर 2-1 अशी मात केली होती. करमनला लहानपणापासून आदित्य सचदेव प्रशिक्षण देत आहेत. पण सध्या ती बाहेर टेनिंग घेत असल्याने ते तिला सातत्याने मार्गदर्शन करू शकलेले नाही. तिच्या मानसिकतेवर काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले.

Related posts: