|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एका रात्रीत 705 संशयितांवर कारवाई

एका रात्रीत 705 संशयितांवर कारवाई 

जिल्हा पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑलआऊट’

प्रतिनिधी / ओरोस:

जिल्हय़ातील वाढत्या चोऱयांना आळा घालण्यासाठी रविवारी रात्रभर ‘ऑपरेशन ऑलआऊट’ राबविण्यात आले. यात 705 संशयित व्यक्ती, 36 वाहने, 12 वॉन्टेड आरोपी, रेकॉर्डवरील 15 आरोपी, आठ सराईत आरोपी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

 दरम्यान, या मोहिमेत आठ समन्स आणि एका वॉरन्टची बजावणी करण्यात आली आहे. एकूण 37 संवेदनशील ठिकाणी, 24 लॉजवर छापे टाकण्यात आले. मोटार वाहन प्रतिबंधात्मक कायद्याद्वारे पाचजणांवर कारवाई करण्यात आली. जिल्हय़ातील महत्वाच्या चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आली होती.

रविवारी रात्री 10 ते सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये 21 अधिकारी, 82 कर्मचारी व 15 सरकारी वाहनांचा समावेश होता. जिल्हय़ात बिल्डींग कन्स्ट्रक्शन व इतर कामासाठी परराज्यातील कामगार काम करत आहेत. या कामगारांची नावे व पत्ते संबंधित ठेकेदाराकडून घेण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना देण्यात आले आहेत. तसेच या कामगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. संशयित हालचाल आढळून आल्यास तात्काळ कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, चोरी वा घरफोडी गुन्हय़ाबाबतची कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी 02362-228200 येथे संपर्क साधून तात्काळ द्यावी, असे आवाहनही गेडाम यांनी केले आहे.

Related posts: