|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » स्वच्छता ऍप 5385 लोकांकडून डाऊनलोड

स्वच्छता ऍप 5385 लोकांकडून डाऊनलोड 

प्रतिनिधी/ सातारा

शहरात तसेच प्रभागात स्वच्छता असावी, तसेच नागरिकांना पलिकेकडून सर्व सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात म्हणून पालिका प्रयत्नशील आहे. यासाठी स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 अंतर्गत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छ सर्व्हेक्षण ऍप तयार करण्यात आले होते. या ऍपद्वारे शहरातील लोकांच्या तक्रारी पलिकेपर्यंत पोहचत आहेत. आता पर्यंत 5385 लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. तर यावर दिवसाला 300 तक्रारी येतात. यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत.

    शहरातील लोकांना वारंवार निर्माण होणाऱया कचऱया, सांडपाण्याच्या समस्या नेहमी भेडसावत असतात. यावर पालिका काही उपाय योजना करणार आहे का?  असे प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येतात. यासाठी पलिकेने सुरू केलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 अतंर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण ऍप तयार केले होते. यावर प्रभाग तसेच शहराच्या कानाकोपऱयातील समस्यांचा फोटो काढून टाकल्यास पालिका कर्मचारी त्या ठिकाणी जावून स्वच्छता करतात. आतापर्यंत या ऍपद्वारे 14424 तक्रारांची नोंद करण्यात आली आहे. यामधील 12000 तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. असे पलिकेकडून सांगण्यात येत आहे. 

ऑक्टोबरपासून चांगला प्रतिसाद…

हे ऍप जरी एप्रिल 2017 मध्ये लोकांनी वापरण्यास सुरू केले असले तरी याला ऑक्टोबर 2017 पासून चांगला प्रतिसाद मिळला. ते डाऊनलोड करणाऱया लोकांची संख्या वाढत होती. दिवसाला या ऍपद्वारे 300 तक्रारी पालिकेत पोहचतात. त्यानंतर पलिकेने या प्रभागातील तसेच शहरातील समस्या सोडवण्यासाठी टीम तयार केल्या आहेत. या टीम संबंधित ठिकाणी स्वच्छता करतात. असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.