|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दहावीच्या परीक्षेस आजपासून प्रारंभ

दहावीच्या परीक्षेस आजपासून प्रारंभ 

प्रतिनिधी/ सातारा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱया दहावीच्या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. जिह्यातील 115 केंद्रांवर सुमारे 46 हजार 54 विद्यार्थी परीक्षेस बसणार असून कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी 7 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. 

   दहावी परीक्षा 1 ते 20 मार्च या कालावधीत होणार आहे. सातारा 15, कराड 22, पाटण 9, कोरेगाव 10, खटाव 14, खंडाळा 4 जावली 5 फलटण 11, वाई 8, महाबळेश्वर 4, माण 9 अशा एकूण 115 केंद्रांवर 46 हजार 54 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गुरूवारी पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांची दोन दिवसांपासुन परीक्षेचे साहित्य खरेदी करण्याची तायारी सुरू होती. वर्ष भर केलेल्या आभ्यासाचा आज पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परीक्षा केंद्र बाहेर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही मोठया प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. परीक्षेचे टेन्शन विद्यार्थ्यांपेक्षा पालकांच्यात जास्त असलेले पहायला मिळत होते. मुलांना परीक्षेत जास्त मार्क पडावेत यासाठी पालकांकडुन मोठया प्रमाणात कष्ट घेतले जात आहेत. हॉल तिकीट, पेन, पेन्सील आयकार्ड, आदी वस्तु निट आहेत का याची जबाबरदारी पालक आपल्या पाल्याला देत होते. 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सोशलमिडीयाच्या माध्यमातुन शूभेच्छा दिल्या जात आहेत.

  जिल्हयातील ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील प्रयत्न करणार आहे. परीक्षा केंद्रतील वर्गात प्रश्न पत्रिकेचे सिल बंद पाकीट पर्यवेक्षकांनी एक विद्यार्थी व एक व़िद्यार्थीनीची स्वाक्षरी घेवून फोडण्यात येणार आहे. यामुळे पेपर फुटण्यावर आळा बसला जाणार आहे.

Related posts: