|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » वनव्यात 300 एकरातील झाडे जळून भस्मसात

वनव्यात 300 एकरातील झाडे जळून भस्मसात 

ऑनलाईन टीम / बीड

बीड जिल्हय़ातील धारूर तालुक्यातील मोटेवाडी, व्हरकटवाडी आणि कासारी या तीन गावच्या वनविभागाच्या मालकीच्या जंगलामध्ये जवळपास 300 एकर क्षेत्रातील झाडे जळून भस्मसात झाले आहेत.

वनविभागाचे या क्षेत्रात जवळपास दोन हजार एकर जंगल आहे. या जंगलामध्ये वनविभागाने लागवड केलेले व नैसर्गिक पद्धतीने वाढलेली सीताफळ, पळस, साग, शिसू, धामुडा, कडूनिंब या सारख्या झाडांसह मोर, हरीण, खोकड सारखे प्राणी वास्तव्यास आहेत. या जंगलात अचानक लागलेल्या आगीत जवळपास 300 एकरचा वनक्षेत्र जळून खाक झाला आहे. हा वनवा विझवण्यासाठी शेतकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱयांनी प्रयत्न केला असता, या आगीमुळे झाडांचे आणि शेतकऱयांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी ही आग अज्ञात व्यक्तीने लावण्याच्या संशय व्य़कत असून अज्ञात व्यक्ती विरोधात वन विभागाच्या कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

Related posts: