|Monday, December 10, 2018
You are here: Home » Top News » जळगावमध्ये तरूणीचा जळालेल्या अवस्थेत सापळा आढळल्याने खळबळ

जळगावमध्ये तरूणीचा जळालेल्या अवस्थेत सापळा आढळल्याने खळबळ 

ऑनलाईन टीम / जळगाव

नांदगाव-चाळीसगाव सस्त्या जवळ खडकी गावात एका अज्ञात तरूणीचा जळालेल्या अवस्थेत सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खडकी या गावातील समाधान धर्मा कोळी यांच्या शेतात अज्ञात आरोपींनी शुक्रवारी रात्री तरूणीला पेटवून दिल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेह संपूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे ती तरूणी की महिला याचा शोध घेणे पोलिसांना अवघड जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले असून तरूणीला जाळून मारण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

Related posts: