|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांचा राजीनामा

पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांचा राजीनामा 

ऑनलाईन टीम / पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकचे महापौर नितीन काळजे यांनी आज महापौर पदाचा राजीनामा दिला तर नगरसेवक राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्रातील श्रीमंत असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभासदपदी आमदार महेश लांडगे यांना डावलण्यात आल्यामुळे लांडगे समर्थक महापौर काळजे सह अन्य दोन नगरसेवकांनी आपले राजीनामे सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याकडे सादर केले आहे.

या दरम्यात, स्थायी समिती सभासदपदी राहुल जाधव यांना संधी देण्यात माझ्या पदाचा भौगोलिक अडचण झाली असेल म्हणून आमदार लांडगे यांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनापासून महापौर पदाचा राजीनामा देत आहे, असे काळजे यांनी महापौरपदाचा राजीनामा देतांना म्हणाले.

 

Related posts: