|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राष्ट्रीय लोकवाद्य स्पर्धेत गौरव पिंगुळकरला गोल्ड मेडल

राष्ट्रीय लोकवाद्य स्पर्धेत गौरव पिंगुळकरला गोल्ड मेडल 

सावंतवाडी:

मुंबई विद्यापीठातर्फे झारखंड-रांची येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकवाद्य स्पर्धेत सलग दोन वर्षे पिंगुळी गोऊळवाडी (ता. कुडाळ) येथील गौरव वसंत पिंगुळकर (21) याने गोल्ड मेडल प्राप्त करून जिल्हय़ाचे नाव देशात पोहोचविले आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावर्षी त्याने फणसगाव महाविद्यालयातर्फे स्पर्धेत सहभाग नोंदवून विजेतेपद पटकावले.

गौरव पिंगुळकर हा महाविद्यालयीन शिक्षण घेत लोकवाद्याचे प्रशिक्षण घेत आहे. पखवाज, ढोलकी, ढोल, संबळ, डिमडी आदी प्रकारच्या वाद्यांचे शिक्षण त्याने घेतले आहे. त्याच्या या कलेमुळे त्याची मुंबई येथील महोत्सवात निवड झाली होती. तेथून मुंबई विद्यापीठाने गौरव पिंगुळकर याची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी केली. फेब्रुवारी महिन्यात झारखंड-रांची येथे झालेल्या राष्ट्रीय लोकवाद्य स्पर्धेत पिंगुळकर याने यशस्वी सादरीकरण करून तो गोल्ड मेडलचा मानकरी ठरला. त्याची इंटरनॅशनल स्पर्धेतही निवड झाली असून मार्च महिन्यात या स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. 

पांग्रड येथील पखवाज मार्गदर्शक मोहन मेस्त्राr यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. मुंबईचे ढोलकीवादक मार्गदर्शक विजय जाधव, दिनेश सावे यांचेही आपल्याला मार्गदर्शन लाभल्याचे गौरव याने सांगितले. सध्या महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच लोकवाद्य प्रशिक्षण त्याने सुरूच ठेवले आहे. भजनांचे कार्यक्रम, डबलबारी भजनी सामन्यांमध्ये तो भजनी बुवांना तबला, पखवाज, ढोलकीची साथ संगतही करतो. प्रसिद्ध भजन गायक मयुर पिंगुळकर यांचा तो बंधू होय.

Related posts: