|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » एमआयएम राहणार तटस्थ; परिवहन सभापती होणार भाजपचाच

एमआयएम राहणार तटस्थ; परिवहन सभापती होणार भाजपचाच 

प्रतिनिधी /सोलापूर :

भाजप आणि शिवसेनेला मतदान करायचे नसल्याचा आदेश पक्षाने दिल्यामुळे

शुक्रवारी होणाऱया परिवहन सभापती निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय एमआयएमने घेतल्यामुळे भाजपचे गणेश जाधव यांचा परिवहन सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर परिवहन सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले एमआयएमचे झाकीरहुसेन सगरी हे सेनेला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

परिवहन सभापतीपदासाठी जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी निवडणूक होणार आहे. भाजपकडून गणेश जाधव, शिवसेनेकडून तुकाराम म्हस्के, एमआयएमकडून झाकरीहुसेन सगरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. परिवहन समितीमध्ये एकूण 12 सदस्य असून, भाजप 6, सेना 3, काँग्रेस 2, एमआयएम 1 असे पक्षीय बलाबल आहे. तर स्थायी समिती सभापती परिवहनचे पदसिध्द सदस्य असल्याने त्यांनाही मतदानाचा अधिकार आहे. परंतु स्थायी सभापती निवडणूक अद्याप न झाल्याने  भाजप व विरोधीपक्ष शिवसेना, काँग्रेस, एमआयएम यांचे एकत्रित पक्षीय बलाबल समसमान आहे. मतदान 6-6 असे झाल्यास चिठ्ठीवर सभापती निवड होणे अपेक्षित आहे.