|Saturday, July 20, 2019
You are here: Home » क्रिडा » युकी भांब्री मुख्य ड्रॉमध्ये

युकी भांब्री मुख्य ड्रॉमध्ये 

वृत्तसंस्था/ मियामी

भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांब्रीने मियामी मास्टर्स एटीपी टेनिस स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले आहे. बुधवारी त्याने स्वीडनच्या इलियास येमेरचा सरळ सेट्समध्ये पराभव करून त्याने हे यश मिळविले.

पात्रता फेरीतील दुसऱया व शेवटच्या सामन्यात 25 वषीय युकीने येमेरचा 7-5, 6-2 असा पराभव केला. एकतर्फी झालेला हा सामना सुमारे दीड तास चालला. मुख्य ड्रॉमधील पहिल्या फेरीत युकीची लढत बोस्निया व हर्जेगोविनाच्या मिर्झा बेसिकशी होईल. बेसिक पात्रता फेरीतील दुसऱया सामान्यात पराभूत झाला होता. पण सुदैवाने त्याला मुख्य स्पर्धेत प्रवेश देण्यात आला आहे. भांब्रीने पहिल्या सामन्यात अर्जेन्टिनाच्या रेन्झो ऑलिव्होचा 6-4, 6-1 असा पराभव केला होता. गेल्या आठवडय़ात त्याने इंडियन वेल्स स्पर्धेतही प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते आणि तिसऱया फेरीपर्यंत त्याने मजल मारली होती. सॅम क्वेरीकडून त्याला या फेरीत पराभूत व्हावे लागले होते.