|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आज साताऱयात राज्य सेवा पूर्व परीक्षा

आज साताऱयात राज्य सेवा पूर्व परीक्षा 

प्रतिनिधी/ सातारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आज घेण्यात येत असून साताऱयातील 22 उपकेंद्रांवर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. एकूण 8 हजार 712 उमेदवार या परीक्षेचा पेपर आज सोडवणार असून त्यासाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असल्याचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकाऱयांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

8 रोजी दोन सत्रात ही परीक्षा होणार असून सकाळी 10. 30 ते 1 व दुपारी 2. 30 ते 5 या वेळेत पेपर होणार आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांमध्ये कॉपी व गैरप्रकारांचा प्रयत्न करणाऱया घटनांची गांभीर्याने दखल घेतले आहे. त्यामुळे कडक उपाययोजना करण्यात आल्या असून त्यानुसार असे कोणी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशी दोन्ही स्वरुपाची कारवाई होणार आहे. परीक्षा उपकेंद्रांवर पोलिसांकडून तपासणी होणार असून कॉपी व गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेवर जिल्हाधिकारी स्वतः लक्ष ठेवणार आहेत.

दरम्यान, आज साताऱयातील सातारा पॉलिटेक्निक, सोनगाव, अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल, महाराजा सयाजीराव विद्यालय, लालबहादूर शास्त्राr कॉलेज, कन्याशाळा, अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग वर्ये, अनंत इंग्लिश स्कूल, यशोदा टेक्निकल कॅम्पस वाढे, न्यू इंग्लिश स्कूल, सायन्स कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक वर्ये, भारत विद्यामंदिर, डी. जी. कॉलेज, भवानी विद्यामंदिर, कला व वाणिज्य महाविद्यालय, केबीपी कॉलेज इंजिनिअरींग, श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे, सुशिलादेवी साळुंखे हायस्कूल, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर व छ. शिवाजी कॉलेज अशा 22 उपकेंद्रांवर दोन सत्रात ही परीक्षा होणार असून 337 खोल्यांमध्ये 8 हजार 712 उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.