|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » फोर्टिसच्या स्पर्धेत चिनी कंपनी

फोर्टिसच्या स्पर्धेत चिनी कंपनी 

2300 कोटीची गुंतवणूक करण्याची ऑफर

वृत्तसंस्था / मुंबई

फोर्टिस हेल्थकेअरचे अधिग्रहण करण्यासाठी चीनमधील आरोग्यसेवा क्षेत्रातील फोसन हेल्थ होल्डिंग्सने प्रतिसाद दिला आहे. यामुळे फोर्टिसचे अधिग्रहण करण्यासाठी असलेली स्पर्धा अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. फोसन इन्टरनॅशनलची उपकंपनी असणाऱया या कंपनीने फोर्टिसमध्ये 2,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून यामध्ये 100 कोटीच्या प्राथमिक गुंतवणुकीचा समावेश आहे.

चिनी कंपनीच्या या ऑफरमुळे फोर्टिसच्या व्यवस्थापन पेचात पडल्याचे समजते. फोर्टिसमध्ये अतिरिक्त गुंतवणुकीसह आरएचटी हेल्थ ट्रस्टमधील 25 टक्के हिस्सेदारी खरेदी करत व्यवस्थापनामध्ये कोणताही बदल न करण्याचा प्रस्ताव मांडला. पुढील 45 दिवसांत 100 कोटी रुपये फोर्टिसमध्ये गुंतविण्यात येतील. फोसनने आतापर्यंत 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रात केली आहे. याव्यतिरिक्त मनिपाल हॉस्पिटल इन्टरप्रायजेस, हीरो समूहाचे सुनील मुंजाळ यांनी डाबर समुहाच्या अरविंद बर्मन आणि मोहित बर्मन यांच्यासह संयुक्तपणे ऑफर केली आहे.